धक्कादायक : थेट सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची मोठी आर्थिक फसवणूक; त्यानंतर धमकी देऊन उकळली खंडणी, वाचा सविस्तर प्रकरण

556 0

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कारण ही फसवणूक सर्वसामान्य व्यक्तीची नाही तर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये राजेश पोटे, संदेश पोटे आणि प्रियंका सूर्यवंशी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2015 पासून सुरू होता. या तिघांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून भोर येथे शेतजमीन विकत घेऊन देतो असे सांगितले होते. यासाठी त्यांच्याकडून 60 लाख रुपये घेण्यात आले. पण त्यानंतर कोणतीही जमीन त्यांना दिली नाही. तर पैसे परत मागितल्यानंतर त्यांना धमकवण्यात आले आणि पुन्हा आर्थिक नुकसान करण्याची देखील भीती घालण्यात आली.

एवढेच नाही तर पुन्हा एकदा मार्च 2021 मध्ये आणखी सहा लाख रुपयांची खंडणी त्यांच्याकडून उकळली आहे. अखेर या पोलीस अधिकाऱ्याने निवृत्त झाल्यानंतर या प्रकरणी तक्रार दिली असून फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!