पुणे : अनेक दिवस पावसानं दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे .
पुणे शहरांमध्ये देखील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे . दरम्यान विमाननगर, विद्यानिकेतन शाळेजवळ एक झाड कोसळले.
या झाडपडीच्या घटनेमध्ये एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले असून , इतर कोणतीही हानी झालेली नाही . तरी पाऊस सुरू असताना कोणत्याही झाडाखाली उभे राहू नये असे आवाहन सातत्याने करण्यात येत असते . झाड रस्त्यात आडवे पडल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.