ऐकावे ते नवलच : शिट्टी मारून पोपट झोप मोडतो म्हणून थेट मालकावर गुन्हा दाखल

257 0

पुणे : पुण्यात केव्हा काय घडेल हे खरंच सांगता येत नाही . आता हे ऐकून तुम्हाला नक्की नवल वाटेल की , पुण्यामध्ये पोपट शिट्टी मारतो आणि त्यामुळे झोप मोडते आहे यावरून वाद झाला ,आणि हा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे.

तर हे प्रकरण आहे पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात राहणाऱ्या अकबर अमजद खान यांच्या घरातील पोपटा संदर्भात … याच परिसरात राहणाऱ्या सुरेश शिंदे यांना बघून हा पोपट शिट्ट्या मारत असायचा. यावरून सुरेश शिंदे यांची झोप मोड व्हायची . याचा राग येऊन अकबर अमजद खान आणि सुरेश शिंदे यांच्यामध्ये वाद झाला ‘तुम्ही त्याला दुसरीकडे ठेवा.’ असे म्हणून सुरेश शिंदे यांनी शिवेगाळ केली . आणि मालका विरोधात थेट खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे . आता नेमका गुन्हा काय दाखल केला आहे आणि त्यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं कुतूहलाच ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide