garder callopesd

पुण्यातील वाकडेवाडीत 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला; परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

276 0

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या वाकडेवाडी परिसरात आज सकाळी 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला आहे. यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हा मेट्रोचा गर्डर ज्या ठिकाणी कोसळला तो भाग अत्यंत वर्दळीचा भाग आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या संदर्भात ट्रक चालकाने दिलेल्या माहितीनुसार, या ट्रकच्या समोर अचानक कार आल्याने ट्रक चालकाने अर्जंट ब्रेक मारला. यामुळे या गर्डरची चेन तुटली आणि हा अपघात झाला. कारला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडला आहे. या गर्डरचे वजन जास्त असल्यामुळे तो बाजूला काढण्यात थोडा व्यत्यय येत आहे. हा गर्डर लवकरात लवकर बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide