भरधाव वेगात वाहन चालवल्याने अनेकदा गंभीर अपघात होत असतात. असाच एक गंभीर अपघात पुण्यात झाल्याने वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यात गाडी स्लीप होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात न्यायच्या आधीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील तळजाई टेकडीच्या परिसरात घडली.
कुणाल सूर्यकांत बडदे (वय २४, रा.सदानंदनगर, मंगळवार पेठ) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी साडेचार वाजता तळजाई टेकडीवर असलेल्या सदु शिंदे स्टेडियमजवळ कुणालचा अपघात झाला. कुणाल हा भरधाव वेगात जात असताना टेकडीच्या उतारावर त्याचं दुचाकी वरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे दुचाकी स्लिप झाली. ज्यामुळे कुणाला गंभीर दुखापत झाली.
तात्काळ कुणाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र ते आधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांमलदार राहुल हजारे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.