Doctor In wari

पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभागाची 40 वैद्यकीय पथकं सज्ज

462 0

पुणे : विठुरायाच्या ओढीने आळंदी, देहुतून निघणारा वैष्णवांचा भक्तीसोहळा पुण्यामध्ये येण्यासाठी केवळ दोन दिवसच उरले आहेत. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथकं, मोफत औषधोपचार, रुग्णवाहिका, कीटकनाशक फवारणी याची जय्यत तयारी सुरु आहे.

या वारीनिमित्त पुणे शहरात कमला नेहरू रुग्णालय, डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालय, 18 प्रसूतीगृह, 16 रक्तपेढ्या, 2 फिरते दवाखाने आणि 1 लसीकरण केंद्र अशी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय पालखी मार्गावरील सर्व खासगी दवाखान्यांमध्ये प्रत्येकी 10 खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी दरम्यान 86 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य सुविधांसह तैनात असणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर 21 ठिकाणी तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 16 वैद्यकीय पथकं उपलब्ध असणार आहे.

सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी पथकं प्रथमोपचारासह फुले नगर, विश्रांतवाडी, पाटील इस्टेट वाकडेवाडी याठिकाणी सकाळपासून उपस्थित राहतील. वैद्यकीय पथकं सासवड मुक्कामापर्यंत पालखीसह राहतील. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज आहेत.जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, राज्य शासनाच्या आरोग्य विभागासह शासकीय, सामाजिक संस्था आणि पुण्याचे वैशिष्ट्य असणारी गणेशमंडळ यांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सर्व तयारी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!