Breaking News

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 322 वी जयंती ! ब्राह्मण महासंघाच्यावतीने भव्य मिरवणूक

286 0

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे यांची 322 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ब्राह्मण महासंघाच्यावतीने प्रभात थिएटर ते शनिवारवाडा अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अशा ढंगात ही मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी फुगड्या खेळत आनंद साजरा केला.श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झाला होता. थोरले हे पेशवे घराण्यातील सर्वात कर्तबगार व स्वराज्य विस्तार दूरवर पसरविणारे पेशवा म्हणून इतिहासात उल्लेखित होते.

अनेक कठीण व दुर्गम लढाई मध्ये यश संपादन करण्याची कुशल युद्धनीतीमुळे बाजीराव पेशव्यांना नावलौकिक प्राप्त झाला. आज श्रीमंत बाजीराव पेशवा यांची 322 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रभात थिएटर ते शनिवारवाडा भव्य मिरवणूक काढण्यात आली.शनिवारवाड्यातील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेता येईल यासाठी बनविण्यात आलेल्या सरकत्या जिण्याचे लोकार्पण करण्यात आलं.

 

Share This News
error: Content is protected !!