Pune Murder News

Pune Murder News : पुणे हादरलं ! पुण्यात कारचा धक्का लागल्याच्या वादातून तरुणाची निर्घृणपणे हत्या

899 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पुण्यात (Pune Murder News) कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पुण्यात हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कारचा धक्का लागून तरुणांमध्ये वाद झाला होता. या वादामधून धारदार हत्याराने वार करीत 30 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक संजय भोसले (वय 30, रा. शेवाळवाडी, मांजरी) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी 7-8 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha News : संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; 3 अज्ञात तरुणांची सभागृहात घुसखोरी

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!