दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, पुना क्लब संघांची विजयी सलामी

367 0

पुणे : बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि पुना क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी देत शानदार सुरूवात केली.

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार आणि मध्यमगती गोलंदाज पुनित बालन याच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुनित बालन ग्रुपने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा डाव १६ षटकात ७७ धावांवर गडगडला. अजिंक्य अनारसे (२० धावा) आणि महाडीक एझान (नाबाद १२ धावा) हे दोनच फलंदाजी दोन अंकी धावसंख्या गाठू शकले. पुनित बालन यांनी २२ धावात ४ गडी बाद करून प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी कापून काढली. अक्षय दरेकर (३-८) आणि आतिश कुंभार (२-७) यांनी कर्णधार पुनित बालन याला दुसर्‍या बाजूने योग्य साथ देत विश्‍वास सार्थ ठरवला. हे आव्हान पुनित बालन ग्रुपने ५ षटकात पूर्ण केले. मेहूल पटेल (नाबाद २७ धावा) आणि प्रितम पाटील (नाबाद ३६ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

धनराज परदेशी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पुना क्लब संघाने हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ६ गडी राखून सहज पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. धनराज परदेशी याने २० धावात ४ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्सः १६ षटकात १० गडी बाद ७७ धावा (अजिंक्य अनारसे २०, महाडीक उझान नाबाद १२, पुनित बालन ४-२२, अक्षय दरेकर ३-८, आतिश कुंभार २-७) पराभूत वि. पुनित बालन ग्रुपः ५ षटकात १ गडी बाद ७९ धावा (मेहूल पटेल नाबाद २७, प्रितम पाटील नाबाद ३६); सामनावीरः पुनित बालन;

हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः

१८.२ षटकात १० गडी बाद ११२ धावा (स्वप्निल फुलपगार ४१, सचिन राठोड ४६, धनराज परदेशी ४-२०, विश्‍वराज शिंदे ३-१४) पराभूत वि. पुना क्लबः १६.३ षटकात ४ गडी बाद ११३ धावा (अखिलेश गावळे ४६, अजिंक्य नाईक नाबाद २१, अकिब शेख १७); सामनावीरः धनराज परदेशी

Share This News
error: Content is protected !!