५ तासात पुणे शहरात झाडपडीच्या १३ घटना

359 0

पुणे:पुणे शहर आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.आज ५ तासामध्ये १३ झाडपाडीच्या घटना घडल्या असल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाने दिली आहे.यामध्ये दत्तवाडी पोलीस चौकी नजीक झाड पडीची घटना घडली असून शिवणे,टिंगरेनगर,लुल्लानगर,भवानीपेठ,औंध,प्रभात रोड,नाना पेठ,कळसगाव,कोथरूड, एरंडवणे,हडपसर अशा वर्दळीच्या ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान झाडपडीसह महानगर पालिका इलेकट्रीक पोल वाकणे,आग लागणे या घटनांची देखील वर्दी पुणे अग्निशमक दलास मिळाली आहे.या सर्व घटनांमध्ये कोठेही जीवित हानी झाली नसून नागरिकांनी वाहन चालवताना,इलेकट्रीक पोल जवळ पाऊस सुरु असताना थांबू नये,तसेच झाडाखाली देखील थांबणे टाळावे अशा सतर्कतेच्या सूचना अग्निशमक दलाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!