मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत असून 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यानं मोठी चुरस निर्माण झाली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणूकीत काँग्रेस मत फुटण्याचा दावा केला असून माजी राज्यमंत्री आणि नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि वांद्रे पश्चिमचे आमदार झिशान सिद्दीकी कुणाला मतदान करणार असाही एक प्रश्न निर्माण झाला होता काल पार पडलेल्या काँग्रेस आमदाराच्या बैठकीत झिशान सिद्दीकी अनुपस्थित होते.
आपल्याला या बैठकीचं निमंत्रण नसल्यानं बैठकीला अनुपस्थित होतो असं झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं आहे. मात्र जरी मला बैठकीचं निमंत्रण मिळालं नसलं तरी मी काँग्रेस पक्षासोबत आहे आणि काँग्रेस उमेदवाराला मतदान करणार असल्याचं झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं आहे.