माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये समित कदम यांचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात समित देशमुख हे नाव चर्चेला आले नेमके कोण आहेत हे समित देशमुख पाहुयात
गृहमंत्री असताना समित कदम हे मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं असून दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर खोटा आरोप लावण्यास सांगितलं होतं. मात्र या आरोपावर स्वतः समित कदम यांनी देखील उत्तर दिलं असून मी अनिल देशमुख यांच्या बोलावण्यावरून त्यांना भेटायला गेलो होतो याच्याशी देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नेमके हे समित कदम आहेत कोण असा प्रश्न पडला आहे..
कोण आहेत समीत कदम
1982 मध्ये सर्वसामान्य कुटुंबात समित कदम यांचा जन्म झाला
2008 पासून समित कदम हे जनसुराज्य पक्षांमध्ये कार्यरत आहेत
सध्या जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून समीर कदम यांच्याकडे जबाबदारी आहे
सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही समित कदम यांची ओळख आहे
2014 ते 19 या कार्यकाळात राज्यात युती सरकार असताना सुमित कदम यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्षपद सांभाळलं आहे
एकंदरीतच अनिल देशमुख यांनी केलेल्या या आरोपानंतर राज्यातील राजकारण तापलं असून यामुळे समित कदम चांगलेच चर्चेत आले आहेत…