Breaking News

प्रियांका गांधीविरोधात निवडणूक लढणाऱ्या भाजपाच्या नव्या हरिदास आहेत तरी कोण?

670 0

नुकतीच भाजपा कडून झारखंड विधानसभेच्या 66 उमेदवारांसह विविध राज्यातील पोटनिवडणुकांसाठीही उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नव्या हरिदास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नव्या हरिदास या काँग्रेसने त्या प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. प्रियंका गांधी विरोधात निवडणूक लढणार या नव्या हरिदास आहेत तरी कोण पाहूयात

लोकसभा निवडणुकीवेळी अमेठी आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर विजयी झाल्यानंतर नियमाप्रमाणे एका जागेचा राजीनामा देणं बंधनकारक असतं आणि यामुळे राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी देऊ केली. गांधी यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडून माजी मंत्री स्मृती इराणी यांच्या नावाची वायनाड लोकसभेसाठी चर्चा होती भाजपकडून नव्या हरिदास यांना उमेदवारी देण्यात आली.

कोण आहेत नव्या हरिदास? 

  •  नव्या हरिदास केरळमधील भाजपाच्या महिला नेत्या

 

  •  केरळ भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत नव्या हरिदास

 

  •  कोझिकोड महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून विजयी

 

  •  2021 मध्ये कोझिकोड दक्षिण या मतदार संघातून नव्या हरिदास यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला

 

  • दरम्यान आता वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आपला गड राखतं की भाजपाचा कमळ फुलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Share This News
error: Content is protected !!