चर्चा विधानसभेचे आढावा मतदार संघाचा या विशेष कार्यक्रमांमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील 199 क्रमांकाचा मतदारसंघ दौंड विधानसभा मतदारसंघाबद्दल या मतदारसंघात भाजपाचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत
2009,14 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील लढती कशा झाल्या होत्या आणि कुणाचा विजय झाला होता पाहूयात
2009 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष,रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राहुल कुल, भाजपकडून वासुदेव काळे निवडणुकीच्या रिंगणात होते.
या निवडणुकीत अपक्ष रमेश थोरात यांनी 85,764 मतं मिळवत विजय मिळवला होता
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल कुल यांना 68,322 मतं मिळाली होती
भाजपाच्या वासुदेव काळे यांना अवघी 7,063 मतं मिळाली होती
2014 मध्ये राज्याची युती व आघाडी तुटल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून राहुल कुल, राष्ट्रवादीकडून रमेश थोरात, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजाराम तांबे निवडणुकीच्या रिंगणात होते
या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या राहुल कुल यांनी 87,649 मतं मिळवत विजय मिळवला होता
राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना या निवडणुकीत 76,304 मतं मिळाली होती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजाराम तांबे यांना 17,098 मतं मिळाली होती
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून राहुल कुल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रमेश थोरात निवडणुकीच्या रिंगणात होते
या निवडणुकीत भाजपाच्या राहुल कुल यांना 1,03,664 मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला
राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना 1,02,918 मत मिळाली अवघ्या 746 मतांनी रमेश थोरात यांचा पराभव झाला
आगामी 2024 च्या निवडणुकीत महायुतीकडून राहुल कुल यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानं सध्या अजित पवारांसोबत असलेले रमेश थोरात तुतारी फुंकतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्यात