Supreme Court : धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा ? उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; 1 ऑगस्टला होणार ‘या’ प्रकरणांवर सुनावणी

335 0

मुंबई : सत्ता संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह नक्की कोणाचं ? या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर वादंग सुरू असतानाच निवडणूक आयोगा पुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला. दरम्यान निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. 

याप्रकरणी उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असून , अर्ज मान्य करून सुनावणीची तयारी देखील दाखवली आहे.  1 ऑगस्टला या प्रकरणावर सुनावणी होणार असून शिंदे गट आणि शिवसेना यांच्याकडून दाखल इतर याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटास पक्षांतर्गत सुरू असलेल्या विरोधाची कारणे लेखी देण्यास सांगितला आहे.

परंतु निवडणूक आयोगाचा हा आदेश असंविधानिक आणि घाईघाईने घेतलेला असल्याच उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे. दरम्यान बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत शिवसेना कोणाची? हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही , शिंदे गट बेकायदेशीरपणे संख्या वाढवून संघटनेत कृत्रिम बहुमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रकरण न्यायालयासमोर न्याय प्रविष्ट असताना याची चौकशी करणे हा न्यायालयाचा अपमान आहे असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

Share This News
error: Content is protected !!