नक्की कोण कुणाचं ? शिंदे गटाच्या विरुद्ध फायली पुरवणारे भाजपचेचं लोक ? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट ! वाचा काय म्हणाले संजय राऊत
नागपूर : सध्याचं राजकारण हे खऱ्या अर्थाने नकारात्मक राजकारणाचा काळा चेहरा समोर आणणार ठरतं आहे. रोजच प्रत्येक पक्षाच्या नेत्यावर वेगवेगळे आरोप होत असतात. आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा धरून थेट शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्येच संशयाची सुई टोचली आहे.
संजय राऊत यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, “भाजप आणि शिंदे गट दोघे मिळून सरकार चालवत आहे. पण प्रकरण एकाच गटाचे बाहेर येते आहे. यावरून फायली कोण देतंय हे समजून जा. आम्हाला भाजपचे लोक फाईली पुरवत आहेत. असा गप्प स्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
अधिवेशनामध्ये सीमा प्रश्नाचा ठराव येणार होता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सीमावादाचा ठराव येत असताना इतर कोणतेही विषय घेऊ नका. म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण विधानसभेत मांडली नाहीत अनेक प्रकरणा आहेत ही प्रकरण देणारे तुमचेच सहकारी आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी घोटाळा यासारखे अजून अनेक प्रकरण बाहेर येतील, असा दावा करून महाराष्ट्रातील असो दिल्लीतील असो की इतर राज्यातील सरकारमधील भ्रष्टाचारी लोक राजीनामा देत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचार नको मोदी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असं सांगितलं पण त्यांनी आजूबाजूला पाहिलं असतं तर भ्रष्टाचारी रोप दिसले असते. या सरकारचा हेतू भ्रष्टाचार करणे आहे. आम्ही हे सरकार चालू देणार नाही असा थेट इशारा देखील यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.
