“सत्ता असो किंवा नसो,मतदार संघासाठी निधी कमी पडणार नाही”…! धनंजय मुंडे यांची ग्वाही

187 0

परळी : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज परळी मध्ये त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की, “मंत्री नसल्याचा मला जास्त आनंद होत आहे.सत्ता नसताना मतदारसंघाचा निधी रोखण्याचं काम इथल्या लोकांनी केलं होतं. पण सत्ता असो की नसो, मतदार संघासाठी निधी कमी पडणार नाही…!”अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे.

दरम्यान मंत्री असल्याने मुंबईत राहावे लागायचे,बैठका घ्याव्या लागायच्या… त्यामुळे तुमच्यात राहता येत नव्हते. आता जमिनीवर आल्यासारखे आणि सर्वांसारखं असल्यासारखं वाटतं. मंत्री नसल्याचाच मला जास्त आनंद होत आहे. अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी त्यांनी केली.

आपल्या मतदारसंघातील जनतेला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देतानाच,आगामी काळात राज्याच्या राजकारणात परळी मतदारसंघाचे कर्तृत्व एवढे मोठे असेल की,परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय राज्यात कुठलीही मोठी राजकीय घडामोड होणार नाही असे देखील ते म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!