साध्या पत्रकाराकडे एवढे पैसे आले कुठून ? संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

269 0

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, संजय राऊत यांना अटक होणार ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती,उशिरा कारवाई झाली यापूर्वीच संजय राऊत यांना अटक व्हायला पाहिजे होती.साध्या पत्रकाराकडे एवढे पैसे आले कुठून ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.संजय राऊत व उद्धव ठाकरे यांनी पदाचा दुरूपयोग केला.संजय राऊत यांनी महिला सोबत शिवीगाळ सुद्धा केली आहे.भ्रष्टाचारी संजय राऊत आहे.चोरी केली नाही तर भीती कशाला ?हा महाराष्ट्र अन्यायाविरुद्ध लढणारा महाराष्ट्र आहे असं नवनीत राणा यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं.

Share This News
error: Content is protected !!