Supriya-Sule

Supriya Sule : अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट

567 0

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज भाष्य केले आहे. यावेळी त्यांना पार्टीत विभाजन झाले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच जेव्हा त्यांना अजित पवार यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सध्याचे स्थान काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. आता त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली आहे. त्या विरोधात आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दिली आहे असे त्यांनी यावेळी उत्तर दिले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!