Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपाला द्यावं लागलं स्पष्टीकरण

561 0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपण किती काळ अर्थमंत्रीपदावर राहणार हे माहित नाही, असं म्हटल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. आज माझ्याकडे अर्थ मंत्रालय आहे, त्यामुळे तुम्हाला योजनांचा लाभ देणे हे माझे काम आहे. मात्र, ही जबाबदारी माझ्यावर किती काळ राहील, याबाबत काहीही सांगता येणार नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्याने हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले कि, भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसतं. उद्या काय होईल? किंवा तुमचा-माझा उद्याचा दिवस कसा असेल? हे कुणालाच माहीत नसतं. त्यामुळे अजित पवारांचं विधान हे नैसर्गिक विधान आहे. ते राजकीय विधान नाही.

Share This News
error: Content is protected !!