ठळक बातम्याराजकारण

ASHISH SHELAR : भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक टोलवाटोलवी ; “आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता , आम्ही तुम्हाला ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का ? “

मुंबई : सध्या राजकारणामध्ये वैयक्तिक आयुष्य , राजकारणातील निर्णय , पक्षाचे नाव , राजकीय नेत्याचे नाव आणि अशा कित्येक गोष्टींवरून राजकीय वर्तुळात एकमेकांवर शाब्दिक चिखल फेक सुरूच असते. एकीकडे शिवसेना नक्की कुणाची असा वाद सुरू आहे . अशातच आता भाजपचे पक्ष चिन्ह कमळ यावरून शिवसेनेने कमळाबाई असे म्हणत भाजपला डिवचले .

त्यावरून ” आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता , आम्ही तुम्हाला ‘ पेंग्विन सेना ‘ म्हणायचं का ? ” असा खोचक उपहासात्मक टोला आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिला आहे.