प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीकडे ‘या’ सहा जागा मागणार

752 0

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत बैठकांना वेग आला असून आज हॉटेल ट्रायडेंट या ठिकाणी महाविकास आघाडीचे बैठक होणार आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण नाना पटोले वर्षा गायकवाड बैठकीसाठी दाखल झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील बैठकीसाठी उपस्थित आहेत याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील या बैठकीसाठी उपस्थित असून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर व धैर्यवर्धन फुंडकर हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा जागावाटप निश्चित होण्याची शक्यता असून या बैठकीत प्रकाश आंबेडकर हे सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीचा दावा सांगू शकतात अशी माहिती टॉप न्यूज मराठीला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी आणि अमरावती या जागांवर वंचित बहुजन आघाडी आपला हक्क सांगण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!