Ashok Chavan : आघाडीत नाराजीने बिघाडी ; उद्धव ठाकरेंचा ‘तो’ निर्णय परस्पर ; पदांसाठी रस्सीखेच सुरू

402 0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्या नाट्याचा पहिला अंक संपला आता दुसऱ्या अंकामध्ये महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा विधानसभा संख्याबळ 55 वरून थेट पंधरावर आलं त्यामुळे संख्याबळाच्या आधारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला देण्यात आलं याबाबत अशोक चव्हाण म्हणाले की , “विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस इच्छुक होती. परंतु आम्हाला न विचारताच शिवसेनेने परस्पर हा निर्णय घेतला त्यामुळे काँग्रेसमध्ये याबाबत स्वाभाविक नाराजी आहे .” असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपसभापतींना दानवे यांची निवड विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदी करण्याचे शिफारस पत्र दिले उपसभापती नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे याच कारणामुळे आघाडीत नाराजीने बिघाडी झाली आहे दरम्यान ज्यांचा आकडा मोठा त्यांनाच विरोधी पक्षनेते पद त्यामुळे विधान परिषदेत आमचं संख्याबळ जास्त आहे विरोधी पक्षनेते पद देखील आमचाच आहे असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे .

विधान परिषदेत सध्या काँग्रेस राष्ट्रवादीचे 10 सदस्य आहेत तर शिवसेनेचे 12 सदस्य आहेत त्याचबरोबर उपसभापती शिवसेनेच्या नीलम गोरे आहेत त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावं अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

Share This News
error: Content is protected !!