Eknath And Uddhav

ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ दोन शिलेदारांचा शिंदे गटात प्रवेश

513 0

मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
कांदिवली (Kandivali) बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे (Correspondent Eknath Hundare) आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी (Former Corporator of Madh Ganesh Bhandari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) तोंडावर हा पक्ष प्रवेश झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
पैसे असून देखील मुंबईत (Mumbai) कामं होत नव्हती. भ्रष्टाचार बोकाळला होता. मात्र सत्तेत आल्यापासून आपण आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी कामांचा जो झपाटा सुरू ठेवलाय, त्याने मुंबईतील सर्वच पक्षीय लोकप्रतिनिधी प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत अशी टीका यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!