Maharashtra Politics : ‘शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी…’! शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना

241 0

ठाणे : शिवसेना सोडून गेलेल्यांच्या रक्तात शिवसेना नव्हतीच, गेलेले ते गद्दारच आहेत. बंड करण्यासाठी हिंम्मत लागते. शिवसेनेविरुद्ध बंड केले असते, तर गुवाहाटी, सुरतला पळून गेले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर माजी मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी केली आहे.

शिवसंवाद दौऱ्यानिमित्याने भिवंडीतील शिवसैनिकांच्या आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा शिवसेना सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना गद्दार म्हणून संबोधित केले आहे

त्यावेळी खाऊन त्यांना अपचन झाले’ – आदित्य ठाकरे म्हणाले की, तुमची आजच्या दौऱ्यात उपस्थिती हे शिवसेनेवरचे प्रेम असल्याचे दर्शवित आहे. आतापर्यंत घडलेल्या घटना दुःखदायक असून, काहींनी धोका दिला, तर काहींनी गद्दारी केली. ज्यांना परिवारासारखे समजले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. गेले अडीच वर्ष महाविकास आघाडीत होते.

मात्र, त्यावेळी खाऊन त्यांना अपचन झाले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नाव न घेता, आदित्य ठाकरे यांनी केली आहे. पण, आम्ही महाविकास आघाडी सोबत असताना विकासाची कामे केली. राजकारण कमी केलं, ८० टक्के समाजकरण २० टक्के राजकारण केले.’जिथे रहाल तिथे आनंद राहा’ – जिथे रहाल तिथे आनंद राहा. आमदारकीचा राजीनामा द्या, पुन्हा निवडणूक लढवा, नंतर कळेल.

सध्या अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वांना त्रास होऊन लाखो नागरिक बेघर झाले आहे. मात्र, सध्याचे २ जणांच सरकार हे नागरिकांना मदत करू न शकल्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं

‘ठाकरे-दिघे असते तर या गद्दारांचे…’- उध्दव ठाकरेंनी कोविड काळात राज्याला सावरल.मात्र, सद्या राज्यातील राजकारणात नाट्य-सर्कस सुरु असल्याने चांगल्या लोकांना राजकारणात स्थान आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित शिवसैकांना केला. माणुसकीशी गद्दारी केली. उद्धव ठाकरे २ महिने हॉस्पिटलमध्ये असताना २ ऑपरेशन झाले.

अश्यातही हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर नागरिकांशी संर्पक साधून लोकसेवा सुरु ठेवली. ठाकरे-दिघे असते तर या गद्दारांचे काय केले असते, त्यांनी घाणेरडे राजकारण केले. त्यांना आम्ही काय कमी केल, नंतर कळालं की त्यांना मुख्यमंत्री पदाचा पोटदुखी होती, असा निशाणाही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर साधला आहे.

शहरप्रमुख शिंदे गटाच्या संपर्कात

प्रेम आणि आशीर्वाद घेण्यासाठी दौरा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. जनतेकडून हात वरती करून प्रेम आणि आशीर्वाद मागून नवीन महाराष्ट्र बांधणी करायला निघाल्याचे सांगत निरोप घेतला. दरम्यान, भिवंडीतील शहर प्रमुख सुभाष माने शिंदे गटाकडे गेल्याने यावेळी माजी आमदार तथा भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे, श्याम पाटील यांच्या हस्ते शिवसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आलं.

Share This News
error: Content is protected !!