राजकारणविधानसभा निवडणूक विशेष

विधानसभेपूर्वी अजित पवारांची मोठी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ आमदार राष्ट्रवादीच्या गळाला

अमरावती: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळतात अशातच आता राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून काँग्रेसच्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या आमदार सुलभा घोडके यांनी अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते या बॅनर मुळे सुलभा खोडके या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चांना उधार आलं होतं.

सुलभा खोडके यांचे पती संजय घोडके हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असून त्यांच्याकडे अजित पवार यांचे सचिव म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे सुलभा खोडके यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे मानले जात आहे. सुलभा खोडके आगामी विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून लढणार आहेत.