Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : “महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही..” छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य

753 0

राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरु असतानाच ओबीसी व मराठा नेत्यांमध्ये आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या चार सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे हेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यावर भुजबळांनी भाष्य करीत मराठा समाजावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले आहेत छगन भुजबळ?
सगळेच्या सगळे मराठा जर कुणबी होणार आहेत तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा बिल आणा पण बाहेर कोण राहणार आहे? आयोगाचे लोकही राजीनामा देत आहेत. हा ओबीसींचा आयोग राहिलाच नाही हा मराठ्यांचा आयोग झाला आहे असंही छगन भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे पाटील माझ्याविरोधात रोज बोलतो कारण त्याशिवाय त्याचं भाषण कुणी ऐकणार नाही. हरिभाऊ राठोड गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Nanded Accident News : धक्कादायक ! जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या

Share This News
error: Content is protected !!