पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार ; सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोर आज झालेल्या सुनावणीतील प्रमुख मुद्दे…

356 0

MAHARASHTRA POLITICS : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी घटनापीठाने आज कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही ,तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता घटनापीठ नक्की काय निर्णय देते याकडेच राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कोर्टाने शिंदे गटाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही म्हणणं ऐकून घेतलं ,आणि त्यानंतर आता पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला करण्यात येणार आहे.

  • यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवा अशी मागणी केली. लवकरच राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी शिंदे गटाकडून जोर धरते आहे .
  • तर शिवसेनेतील फुटी नंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं असल्याचं शिवसेनेचे वकील कपिल यांनी म्हटल आहे.

दरम्यान अवघ्या पाच मिनिटांमध्ये ही सुनावणी संपली असून , आज पाच न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे झालेली ही पहिलीच सुनावणी आहे.

Share This News
error: Content is protected !!