आज निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडत आहे सुनावणीला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी अन्य दोन आयुक्तांसमोर ही सुनावणी सुरू असून एक गट बाहेर पडला असून मूळ पक्ष आमच्या सोबतच आहे असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे तर आमदारांच्या संमतीनेच आम्ही सत्तेत सहभागी झालो असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला असून अजित पवार गटाकडून 24 पाणी प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आले आमदार व खासदारांची संख्या देखील अजित पवार गटाकडून सादर करण्यात आली असून महाराष्ट्र विधानसभेच्या 53 आमदारांपैकी 42 आमदारांचा पाठिंबा अजित पवार गटाला असल्याचं यामधून दाखवण्यात आले अजित पवारांसह नऊ जणांच्या कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांकडे शरद पवार गटांना धाव घेतली असल्याची माहिती मिळत आहे.