ठळक बातम्यापुणेराजकारण

पुणे महानगरपालिका : सत्ताधारी भाजपच्या ५ वर्षाच्या कामकाजाची चौकशी CAG मार्फत करण्यात यावी ; शिवसेनेचे आंदोलन

पुणे : पुणे महापालिकेच्या आवारामध्ये शिवसेनेने आज जोरदार आंदोलन केल आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि आजी-माजी नगरसेवक यांनी या आंदोलनाला उपस्थिती लावून गेली पाच वर्ष महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या भाजपच्या कामकाजाची कॅग मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


अधिक वाचा : काँग्रेसला मोठे खिंडार ! गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ 64 नेत्यांचा सदस्यत्वाचा राजीनामा


स्मार्ट सिटी , जायका नदी सुधार प्रकल्प यांसारख्या अनेक विकास कामाच्या योजना या पाच वर्षांमध्ये आखण्यात आल्या होत्या. या कामकाजावर कोट्यावधी रुपयांचा खर्च देखील करण्यात आला . परंतु प्रत्यक्षात ही कामे झालीच नाहीत या वरूनच सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे.


अधिक वाचा : ” मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास पूरक ठरेल “…! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


अपूर्ण राहिलेली विकास कामे ,भ्रष्टाचार ,कोट्यावधी रुपयांचा खर्च यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सत्तेत असताना झालेल्या कामकाजाची कॅगमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.