Sanjay Raut

ठाकरे गट पुण्यातील ‘या’ जागा लढणार ?; संजय राऊत यांनी सांगितली नावं

703 0

उद्या पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिव संकल्प मेळावा पार पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पदाधिकारी हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असून या सर्व पदाधिकाऱ्यांना स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत, याबाबतची माहिती आज खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘लोकसभेला काही जागांवर आम्हाला पराभव स्वीकारावा लागला असला तरीही विधानसभेला आम्ही मोठ्या ताकतीने लढू. पुण्यातील जास्तीत जास्त जागा लढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. कोथरूड, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला इथे शिवसेनेचे आमदार आधी निवडून आले होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे ताकद आहे. त्यामुळे या जागा आम्ही लढवू शकतो.’

जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू आहे का केव्हा होईल का, या प्रश्नावर बोलताना महाविकास आघाडीमध्ये कोणताही संघर्ष नाही. ज्या जागा जो पक्ष जिंकेल असं वाटतं, ज्या ठिकाणी ज्या पक्षाची जास्त ताकद आहे त्यांना त्या जागा मिळतील, असे संजय राऊत म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!