दीड महिन्यांपूर्वी मित्र गेला, त्याने मित्राच्याच विधवा पत्नीवर केले अत्याचार; सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

350 0

राज्यभरात महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना त्यात सोलापूर मधूनही भर पडली आहे. सोलापुरात मित्राच्या विधवा पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बालाजी सत्यनारायण नल्ला असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विडी कामगार आहे. तिच्या पतीचे दीड महिन्यांपूर्वीच निधन झाले. आरोपी व पीडित महिलेचा पती हे मित्र होते. ही महिला घरात एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपी बालाजी याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे.

माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या आरोपीला न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास वळसंग पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

Nanded News

Nanded News : शेतात काम करताना घडली मोठी दुर्घटना; बायकोच्या डोळ्यांदेखत नवऱ्याचा तडफडून मृत्यू

Posted by - September 30, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाचा शेतात काम करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…
Palghar News

Palghar News : 17 विद्यार्थिनीसाठी पाणी ठरलं विष; ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - February 29, 2024 0
पालघर : पालघरमधून (Palghar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी पाणी पिताना एक चूक केली आणि…
Accident News

Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं

Posted by - May 8, 2024 0
माधोपूर : आपली एक चूक किती महागात पडू शकते (Accident News) याचा प्रत्यय देणारी एक घटना दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली…
Telgi Scam

Telgi Scam : छगन भुजबळांनी उल्लेख केलेला अब्दुल करीम तेलगी कोण आहे? आणि काय होता स्टॅम्प पेपर घोटाळा?

Posted by - August 28, 2023 0
मुंबई : रविवारी बीडमध्ये अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *