Ravikant Tupkar

Ravikant Tupkar : शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ स्वाभिमान शेतकरी संघटनेतही पडणार फूट? रविकांत तुपकर वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत

572 0

बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उभी फूट पडल्याचे पहायला मिळते गेल्या काही दिवसा अगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते मात्र त्या दौऱ्यामध्ये रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) पाहायला मिळाले नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची अणुउपस्थिती म्हणजेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट असल्याचे पाहायला मिळाले.

रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात मागील काही काळापासून पटत नाही. त्यामुळे संघटनेतच नव्हे, तर बाहेर ही चर्चा आहे ? ती रविकांत तुपकर हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. नुकताचं बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा मोर्चा झाला. मात्र राजू शेट्टी आले असताना तुपकर त्याठिकाणी आले नाहीत. त्यामुळे तुपकर यांची नाराजी उघड झालीय. विशेष म्हणजे तुपकर राजू शेट्टी यांना भेटायला सुद्धा आले नाहीत. त्यामुळे संघटनेत फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. काल तातडीची जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक झाली.

यावेळी तुपकर (Ravikant Tupkar) यांनी संघटना कोणाची खाजगी मालमत्ता नाही, असे म्हणत संघटनेवर दावा केला की काय ? अशी चर्चा सुरू झाली आहे. फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वाघाची शिकार होत नाही, असे म्हणत ही रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींना टोला लगावला.यामुळे रविकांत तुपकर यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर संघटनेत फुट पडणार याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!