Sushilkumar Shinde

Sushilkumar Shinde : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; सुशीलकुमार शिंदेनी केली घोषणा

641 0

सोलापूर : एकीकडे दसऱ्याची धामधूम, तर दुसरीकडे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यांनी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला भेट दिली. यावेळी त्यांनी बोलताना ही मोठी घोषणा केली.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे ?
“मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार” असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावेळी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे निवडणुकीपूर्वी घोषित केलं होतं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!