Sunil Kedar

Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर

510 0

नागपूर : एनडीसीसी बँकेतील घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुनील केदार यांना 22 डिसेंबरला पाच वर्षांची शिक्षा तसेच 12.5 लाखांचा दंड ठोठावला होता.28 डिसेंबरपासून सुनील केदार हे तुरुंगात होते.

सुनील केदार यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर आज न्यायालयाने केदार यांना दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत 6 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करायचे आदेश दिले होते.

राज्य सरकारने केदारांना जामीन देण्यास विरोध दर्शविला होता. त्यानंतर आज दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने सुनील केदार यांची शिक्षा निलंबित करत 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. सुनील केदार यांच्याकडून प्रसिद्ध वकील सुनील मनोहर यांनी युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून राजा ठाकरे यांनी काम पाहिले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!