Sonia Gandhi Health

Sonia Gandhi Health : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

504 0

मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi Health) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानं सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडियाच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यापूर्वी मार्चमध्येही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना ताप येत होता. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बऱ्या होऊन ती घरी परतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!