अशोक चव्हाण यांना मोठा धक्का; मेहुणे भास्करराव पाटील खतगावकरांची सुनेसह हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये घर वापसी

236 0

मुंबई: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये जागावाटपावर जोरदार चर्चा सुरू आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीची जोरदार तयारी करत असतानाच आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसलाय.

अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्यास नुसार मीनल पाटील खतगावकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये घर वापसी केली आहे.

भास्करराव पाटील खतगावकर हे तत्कालीन बिगोली व सध्याच्या देगलूर-बिगोली मतदार संघातून 1990 ते 1998 पर्यंत आमदार होते.

त्यानंतर 1998 ते 2004 पर्यंत भास्करराव पाटील खतगावकरांनी लोकसभेत खासदार म्हणूनही प्रतिनिधित्व केला आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाचा कमळ हाती घेतल्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर ही अशोक चव्हाणांसह भाजपामध्ये सामील झाले होते आगमे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा मीनल पाटील खतगावकर या नायगाव विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून या पार्श्वभूमीवर त्यांनी हा काँग्रेस प्रवेश केला असल्याचं बोलला जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!