आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपा संदर्भात महत्त्वाच्या बैठका सुरू असतानाच आता काँग्रेसने 125 जागांसाठी आग्रह धरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत त्यासाठी निवडणुक आयोगाने तयारी सुरु केली. महायुतीसह महाविकास आघाडीने जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. यानंतर आता विधानसभेसाठी शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाची जागा वाटप संदर्भात बैठका सुरू असून काँग्रेस पक्षाला आता विधानसभेसाठी 125 जागांचा आग्रह धरल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. तर शरद पवार गट 85 ते 90 जागा लढवण्यावर आग्रही तर ठाकरेंची शिवसेना 95 ते 100 जागांसाठी आग्रही आहे.काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसने अधिक जागांचा आग्रह धरलाय. मुक्तच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती होती. सध्या महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण ठरतो याची चर्चा सध्या सुरू आहे परंतु काँग्रेसने 125 जागांचा आग्रह धरल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होती की काय अशी चर्चा सुरू आहे.
काँग्रेस कोणत्या विभागातून किती जागा लढवणार?
-
विदर्भ 38 -40 जागा
-
मराठवाडा 25-30 जागा
-
पश्चिम महाराष्ट्र 20 जागा
-
उत्तर महाराष्ट्र 20 जागा
-
मुंबई 18 जागा