Anil Babar

Anil Babar : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

5578 0

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. खानापूर-आटपाडी विधानसभेचे ते आमदार होते. काल (मंगळवारी) त्यांना न्यूमोनिया झाल्याने दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टेंभू योजनेचे जनक म्हणून अनिल बाबर यांना ओळखले जायचे. ते सलग 20 वर्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर यांच्या निधनाने आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.

अनिल बाबर यांची राजकीय कारकीर्द खालीलप्रमाणे
1972 सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य
1981 बांधकाम विभाग सभापती
1990 खानापूर पंचायत समिती सभापती
1990 ला अपक्ष आमदार म्हणून निवडणून आले.
1999 दुसऱ्यांदा आमदार अपक्ष (राष्ट्रवादीचा पाठींबा)
1999 ते 2008 नॅशनल हेवी इंजिनियरिंगचे अध्यक्ष
2014 व 2019 शिवसेनेच्या तिकिटावर आमदार

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide