Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या अडचणींमध्ये मोठी वाढ ! मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

626 0

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुकेश चंद्रशेखरचा गुन्हेगारी इतिहास आणि लीना मारिया पॉल ही सुकेश चंद्र शेखरची पत्नी असल्याचे फेब्रुवारी 2021 मध्येच जॅकलिन फर्नांडिसला चांगलेच ठाऊक होते परंतु असे असतानाही आरोपी जॅकलीन फर्नांडिसने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि सुकेशसोबत तिचे संबंध सुरू ठेवले.

जॅकलीनच्या वर्तनावर ईडीने प्रश्न उपस्थित केला. तिने परस्परविरोधी विधाने दिली, तपासाची दिशाभूल केली जॅकलिन फर्नांडिसने तिच्या जबाब नोंदवताना परस्परविरोधी आणि खोटी विधाने देऊन तपासाची दिशाभूल करण्यासाठी तिचे विधान जाणूनबुजून बदलले आहे. तिने सुरुवातीला आरोपी सुकेश चंद्रशेखरचे खरे नाव माहित असल्याचे नाकारले होते. पण नंतर पुरावे समोर आल्यावर तिने आपण त्याला ओळखत असल्याचे कबूल केले. सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी इतिहासाची पूर्ण माहिती असतानाही आरोपीने पिंकी इराणी आणि लीपाक्षी यांच्यामार्फत त्याच्याकडून 5,71,11,942 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू घेतल्या.

आरोपी जॅकलिन फर्नांडिसने भेटवस्तू म्हणून मिळालेल्या गुन्ह्याच्या रकमेबाबत आपली भूमिका सतत बदलल्याचे दिसून येत आहे. जॅकलीन केवळ या फौजदारी खटल्यातील साक्षीदार असल्याच्या आधारावर खटला रद्द करण्याची मागणी करू शकत नाही, असे ईडीने म्हंटले आहे. यामुळे जॅकलिनच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Anil Babar : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Prakash Ambedkar : ‘एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यावं’, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर पण ठेवली ‘ही’ अट

Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा

Imran Khan Jail : इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी 10 वर्षांची झाली जेल

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Share This News

Related Post

अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना बिझनेस आयडॉल पुरस्कार जाहीर

Posted by - May 23, 2022 0
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट व्यापारी, व्यापारी संघटना आणि बिझनेस आयडॉल पुरस्काराची आज पत्रकार परिषदेत घोषणा…

राजकुमार संतोषींचा “गांधी गोडसे एक युद्ध” प्रदर्शनाच्या शर्यतीत; नथुरामच्या भूमिकेत मराठमोळा चिन्मय मांडलेकर झळकणार; पहा फर्स्ट लूक

Posted by - December 27, 2022 0
इतिहासातील एक असं पान जे कोणताही भारतीय विसरू शकणार नाही. लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. दामिनी, घायल, घातक अशा…

Optical Illusion : घारीची नजर असणाऱ्यांना देखील या चित्रातील हरिण शोधणे झाले कठीण ; तुम्हाला सापडले का ?

Posted by - August 3, 2022 0
Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन अर्थात एखादी ठराविक वस्तू ,व्यक्ती समोर असेल तरी देखील दिसून येत नाही . अनेक वेळा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *