Eknath Shinde And Amit Shah

अमित शहांसोबतच्या बैठकीत झाला ‘हा’ मोठा निर्णय; CM शिंदेंनी सांगितली पुढील रणनीती

451 0

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. राज्यातील आगामी सर्व निवडणुकी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) एकत्र लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

काम केले नाहीतर तर कानाखाली देईन; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार आहे. याबाबतचा निर्णय अमित शहांसोबतच्या बैठकीत झाला. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या 11 महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत.

धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला 

यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार असा विश्वासदेखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!