Breaking News

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळणार उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी;भाजपचा नवा डाव

207 0

दिल्ली:महाराष्ट्रात भाजपने पाठिंबा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरुद्ध बंड पुकारून ठाकरे सरकार पाडलं. एकीकडे महाराष्ट्रात राजकारणामध्ये मोठे बदल होत असताना, भाजप आता नवीन डाव खेळतो आहे.
शिवसेनेच्या एका दिग्गज नेत्याला उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली. सुरेश प्रभू यांनी अमित शहा यांच्या भेटीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

या फोटोवरून भाजपकडून सुरेश प्रभू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी आता उपराष्ट्रपतीपदी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांना उमेदवारी देऊन नवीन डाव खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Share This News
error: Content is protected !!