uddhav thackery

Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या टीझरमधून ठाकरेंनी ठाकरी भाषेत शिंदेंवर साधला निशाणा

534 0

मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क इथं दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडतो. शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर शिवाजी पार्क येथे कोणत्या गटाचा मेळावा होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. पण नवरात्रोत्सवाच्या काही दिवस आधीच या वादावर पडदा पडला. शिंदे गटाने माघार घेतल्यानंतर महापालिकेने शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळावा घ्यायला परवानगी दिली.तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. यापूर्वी, उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याच्या टीझरमधून शिंदेंच्या शिवसेनेवर जहरी बाण सोडण्यात आला आहे.

काय आहे टीझरमध्ये?
काही जण पळून जाणारे असतात, शेपूट घालून बसणारे असतात, स्वार्थासाठी ईमान विकणारे असतात. शत्रूशी हात मिळवणारे असतात. खाल्या ताटात थुंकणारे असतात. खोक्यांपायी विकले जाणारे असतात. रात्रीच्या अंधारात गद्दारी करून घर फोडणारे असतात. पण, मर्द विकला जात नाही. मर्द गद्दारी करत नाही. मर्दांचे एकच ठिकाण शिवतीर्थ दादर. एक नेता, एक विचार, एक मैदान! दसरा मेळावा मर्दांचा मेळावा! असे या टीझरमध्ये म्हणण्यात आले आहे.

https://www.facebook.com/mieknathshinde/videos/1246858489339632

शिंदे गटाकडूनदेखील शुक्रवारी दसरा मेळाव्याचा पहिला टीझर जाहीर करण्यात आला होता. शिंदे गटाच्या टीझरमध्ये या मर्दाची टक्कर घेण्याची हिंमत कुणीही करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्तानात उभे राहिले पाहिजे. ते चित्र मी हिंदुंच्या आणि हिंदुत्वाच्या रुपाने उभा करतोय, असे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात ऐकू येत आहे. टीझरच्या शेवटी एकनाथ शिंदेंचाही आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे आता लोक कोणच्या दसऱ्या मेळाव्याला गर्दी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!