New Executive of the Thackeray Group

New Executive of the Thackeray Group : ठाकरे गटाची नवी कार्यकारिणी जाहीर; ‘या’ 6 जणांकडे देण्यात आले नेतेपद

575 0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून (New Executive of the Thackeray Group) एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार करत सहा नव्या नेत्यांसोबतच उपनेते आणि संघटकपदाच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाकडून सहा नव्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामध्ये विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे. नेत्यांसोबतच पक्षाचे उपनेते आणि संघटकपदी देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू (मुंबई), शरद कोळी (सोलापूर ) यांना उपनेतेपद देण्यात आलं आहे.

तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या सचिवपदी वरूण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर कायम राहणार आहेत. संघटक म्हणून अस्मिता गायकवाड (सोलापूर), शुभांगी पाटील (नाशिक), जान्हवी सावंत (कोकण), छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रुपवते(मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये एकूण 16 जणांचा समावेश झाला आहे. ज्यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई आदित्य ठाकरे, संजय राऊत चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!