MLA Disqualification

MLA Disqualification : शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

712 0

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यत्र राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) कारवाईला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य 16 आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर येत्या 25 सप्टेंबरला अंतिम फैसला होणार असल्याचे समजत आहे. एका आठवड्यात सुनावणी पूर्ण करून त्याचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या सुनावणीत राहुल नार्वेकर हे अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून काम करतील, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळं आता येत्या 25 सप्टेंबरला होणाऱ्या सुनाणीत राहुल नार्वेकर हे काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार अपात्र झाल्यास एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार हे मात्र नक्की.

जर असे घडले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो. या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि नितीन गडकरी यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळं आता येत्या 25 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर या कालावधीत शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकांचा निकाल लागू शकतो.

Share This News
error: Content is protected !!