शिवसेनेची पुण्यात मोर्चेबांधणी ; मातोश्रीवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक

128 0

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये शिवसैनिकांचे इनकमिंग सुरूच आहे. पुण्यात देखील दोन दिवसांपूर्वी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील कार्यकर्ते शिंदे गटात जाणार नाहीत यासाठी शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यासाठीच आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पुणे शहराध्यक्ष,प्रमुख पदाधिकारी,नगरसेवक यांची महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचे समजते. आदित्य ठाकरे लवकरच पुण्यात युवा सेनेमध्ये नियुक्ती करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!