Dasara Melava

Dasara Melava : शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या आधी चार वक्त्यांची नावे जाहीर

729 0

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळव्याच्या (Dasara Melava) माध्यमातून आज शिंदे गटाची तोफ धडाडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यादरम्यान या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजून कोण भाषण करणार यांची नावे समोर आली आहेत. या चार नेत्यांची यादी शिंदे गटाने जाहीर केली असून हे चार नेते आज उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडणार आहेत. यामध्ये रामदास कदम, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील आणि ज्योती वाघमारे यांचा समावेश आहे.

शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी केली असल्याची टीका त्यांच्यावर कायम केली जात आहे. तसेच शिंदे गटाची मुलूखमैदान तोफ अशी ओळख असलेले शहाजी बापू पाटीलदेखील आज भाषण करणार आहेत. गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि वक्ते आहेत. त्यांची भाषणाची वेगळी स्टाईल त्यांनादेखील आज भाषणाची संधी मिळणार आहे. या सगळ्यांबरोबर ज्योती वाघमारे या देखील आज भाषण करणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!