Eknath, Ajit, Devendra

TOP NEWS MARATHI POLITICAL SPECIAL : खातेवाटपाचा तिढा कायम; ‘या’ कारणांमुळे रखडले आहे खातेवाटप

750 0

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत सरकारमध्ये सामील होण्याचा घेतला राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली नवनिर्वाचित मंत्र्यांना दालन मिळालं शासकीय बंगल्यांचा वाटप झाला मात्र अजूनही खाते वाटप झालं नाही नेमकं खातेवाटप का रखडलं आहे? चला जाणून घेऊयात…

30 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 9 ऑगस्ट 2022 रोजी राज्य मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 9 आणि भाजपाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता 2 जुलैला अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत थेट सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराजबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन 1 महिना उलटला तरी या मंत्र्यांना अद्याप कोणतंही खातं मिळालेले नाही.

खातेवाटप का रखडले?
उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थमंत्री पद देण्यास शिदेंच्या शिवसेनेचा विरोध
सध्या अर्थ खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे.
अजित पवारांसह शपथ घेतलेले मंत्री जेष्ठ आणि अनुभवी असून त्यांना जेष्ठतेनुसार खाती मिळावीत अशी अजित पवारांची मागणी आहे
चांगल्या खात्यांसाठी अजित पवार आग्रही आहे
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना भाजपाच्या कोट्यातून मंत्रीपद द्यायचं की शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद द्यायचं यावरून पेच निर्माण झाला आहे
अजित पवारांना महसूल खातं मिळेल अशी चर्चा मात्र जर अजित पवारांकडे महसूल खाते दिले तर विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोणता मंत्रिपद द्यायचं यावरून देखील पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान खाते वाटपाचा तिढा न सुटल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिल्ली दौरा करत गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अजित पवारांच्या अमित शहांबरोबरच्या भेटीनंतर आता मंत्र्यांना खातेवाटप केव्हा होणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!