MAHARASHTRA POLITICS : शरद पवारांचा ‘खाकस्पर्श’ ; भाजप आमदार अतुल भातखळकरांचे ते Tweet चर्चेत , राजकीय वर्तुळात खळबळ

409 0

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना आता 4 ऑगस्टपर्यंत इडी कोठडी सुनावण्यात आली आहे . राऊत यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर दिला .

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर थेट आरोप प्रत्यारोप देखील केली आहे . तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांनी राऊत यांच्या अटकेचा आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या . विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सकाळी 8 वाजता लागणारा भोंगा आता बंद झाला असे प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकीकडे संजय राऊत यांच्या अटकेनंतर टीका टिप्पणी होत असतानाच एका ट्विटमुळे अधिक खळबळ उडाली आहे . हे ट्विट आहे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचं… या ट्रीटमध्ये अतुल भातखळकर यांनी केवळ एक शब्द लिहिला आहे . जो आहे ‘खाकस्पर्श’ आणि त्यासह त्यांनी तीन फोटो पोस्ट केले आहेत .

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की , राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे तीनही फोटोमध्ये दिसत आहेत . पहिल्या फोटोत त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हात पकडला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांचा हात पकडला आहे . तर तिसऱ्या फोटोमध्ये पवार यांनी संजय राऊत यांचा हात पकडला आहे . हे तीनही नेते ज्यांचा हात शरद पवार यांनी पकडला आहे हे सध्या इडी कारवाईमुळे अटकेत आहेत.  त्यांच्या या फोटो आणि त्यास दिलेल्या कॅप्शनमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!