Sharad Pawar Shirur

Sharad Pawar : शरद पवारांनी दिल्लीतून सूत्र हलवली; कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान घेतले ‘हे’ मोठे निर्णय

926 0

नवी दिल्ली : अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी आपल्या काही समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले आणि सरकारमध्ये सामील झाले. एवढेच नाहीतर अजित पवार यांनी पक्षावर दावादेखील सांगितला आहे. पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज दिल्लीत दाखल होत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे देशभरातील महत्त्वाचे नेते (Sharad Pawar) उपस्थित होते. कार्यकारिणीच्या या बैठकीत 8 महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले.

या बैठकीमध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले लोकप्रतिनिधी आणि नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. पक्षातून सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांची हकालपट्टी करण्यात आली. तसेच एस. आर. कोहली यांचं निलंबन करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळात सामील झालेल्या नऊ मंत्र्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला जात असतानाच शरद पवार यांनी दिल्लीत दाखल होत शक्तिप्रदर्शन केलं असून राष्ट्रवादी पक्ष आपल्याकडेच राहावा, यासाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

Deepak Mankar : अजित पवारांच्या गटाकडून माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

बैठकीनंतर काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट नाही, सत्तेत सहभागी झालेल्यांवर निलंबनाची कारवाई
कोणाला मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधान-उपपंतप्रधान व्हायचं असेल तरीही त्याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही.
कोणीही काहीही दावा करत असलं तरीही पक्षसंघटना आमच्यासोबतच राहणार आहे
निवडणूक आयोगावर आमचा विश्वास, त्यामुळे आम्ही लगेच सुप्रीम कोर्टात जाणार नाही
आयोगाने कायद्याला धरून निर्णय न दिल्यास दुसरा पर्याय आम्हाला शोधावा लागेल
राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे.
महाराष्ट्रात 2024 मध्ये जनता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे सत्ता देईल.

Share This News
error: Content is protected !!